Skip to main content
नवश्या गणपती सेक्टर A समस्यांविषयी, म न पा विरुद्ध तक्रार

नवश्या गणपती सेक्टर A समस्यांविषयी, म न पा विरुद्ध तक्रार

36 signatures 14 to reach 50
P
Pritish K. signed
N
Niranjan T. signed
R
Richa P. signed
V
Vijaya F. signed
Y
Yogeshkumar G. signed
S
Suryakant s. signed
H
Hema P. signed
S
Shirish D. signed
Y
Yogesh V. signed
S
Someone signed
Started by Anonymous 1 month, 3 weeks ago

प्रति, 
मा. पोलीस सह आयुक्त, 
गुन्हे शाखा, 
नाशिक पोलीस आयुक्तालय, 
नाशिक. 

विषय - नवश्या गणपती सेक्टर A या वासहतीतील नागरी समस्यांकडे गंभीर दुर्लक्ष केल्याबद्दल नाशिक महानगर पालिका व संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्या विरुद्ध तक्रार करणे बाबत. 

मा. महोदय, 
नाशिक येथील गंगापूर रस्त्यावरील नवश्या गणपती परिसरात 2 महिन्यापूर्वीच नाशिक महानगर पालिके तर्फे भूमिगत गटार तयार काम करण्यात आले. सेक्टर A मधील वासुदेव बंगल्याच्या जवळून नाल्या पर्यन्त हे काम करण्यात आले होते. श्री. कुमावत (9730675444 ) या ठेकेदारा मार्फत आणि श्री. संतोष जोपळे, कनिष्ठ सिव्हिल इंजिनियर यांच्या तांत्रिक मार्गदर्शना खाली  सदर काम केले गेले. 
पहिल्याच पावसात या कामाच्या ठिकाणचा रास्ता धसु लागला आहे. हा रास्ता वासहतीतील जनतेचा ये जा करण्याचा प्रमुख रास्ता आहे. शाळेच्या व्हॅनस देखील या रस्त्याने जा ये करतात. 8 दिवसांपूर्वी या कामाच्या ठिकाणी रस्त्याचा काही भाग खचला होता. वर नमूद केलेल्या कंत्राटदार आणि इंजिनियर तसेच नगरसेवक साहेबांना त्याची सचित्र कल्पना देण्यात आली होती. नगरसेवक साहेबांनी दखल घेऊन माणूस पाठवला व त्यांनी खचलेल्या भागात फक्त थोडा भराव घातला. कोणतीही तांत्रिक शहानिशा  न करता दुरुस्तीचा देखावा करण्यात आला. नगरसेवक / उपमहापौर श्री. विलास शिंदे यांनी किमान दखल तरी घेतली. मात्र जबाबदार इंजिनियर साहेब किंवा कंत्राटदार यांच्यापैकी कोणी या विषयाकडे लक्ष देण्याची तसदी देखील घेतली नाही. आणि आज त्या ठिकाणी पुनः जमीन धसली आहे. 
धोका - 
या धसलेल्या भागाखाली मोठी पोकळी असण्याची आणि तो भाग अधिक मोठ्या प्रमाणात खचण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. यात शाळेच बस, व्हॅन, दुचाकी किंवा चारचाकी वाहन जर अडकली आणि अपघात घडून जीविताचे किंवा मालमत्तेचे नुकसान होऊ शकते. 
याच रस्त्यावर काही मीटर अंतरावर ड्रेनेजचे ढापे फुटले आहे. त्यात देखील असाच अपघात होण्याची शक्यता आहे. 

या दोन्ही  संदर्भात नाशिक महानगर पालिकेच्या App वर तसेच  प्रत्यक्ष बोलून देखील तक्रार केली. मात्र कोणीही ही बाब गांभीर्याने घेतलेली नाही. आयुक्त, महापौर, उपमहापौर असे सर्व पाहणी रील्स बनवून वातावरण निर्मिती करण्यात रमलेले आहेत. आणि अधिकाऱ्यांच्या मते हा विषय पुरेसा गंभीर नसावा. अशात आम्हा सामान्य नगरिकांकडे काहीही पर्याय न उरल्याने आम्ही सर्वांनी मिळून पोलीस यंत्रणेकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. 
आपणास विनंती आहे की या विषयाची गंभीर दखल घेऊन वर नमूद सर्व अधिकारी, लोकप्रतिनिधी, कर्मचारी, ठेकेदार यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी व्यक्तिगत  गुन्हे दाखल करावेत. जेणेकरून ही लोकं आपले उत्तरदायित्व समजून जबाबदारी घ्यायला तरी शिकतील. आणि सदर दुरुस्ती तातडीने करून धोका टाळू शकतील. 

कृपया आमच्या विनंतीची दखल घेऊन आपण योग्य ती कायदेशीर कारवाई करावी ही विनंती.    

आपले विनीत, 
नवया गणपती नगर रहिवासी 
गँगपूर रस्ता, 
नाशिक 

5 Comments

S
Supporter Verified · petition starter
1 month ago Featured

माझी शाळेत जाणाऱ्या छोट्या मुलांची बस यात अडकून अपघात होईल अशी मला भीती वाटते. आणि रीतसर विनंती अर्ज करून प्रशासन दादच देत नाही. म्हणून मी सही करत आहे. आपणही करा.

V
Vidya Paliwal Verified
1 month ago Featured

This is very serious issues and we have been suffering since more than a decade. The approach road was already bad, and then builder made it worse since last 3 years. No one heard our please for that. Now all the inner lanes are in bad situation. The Nala that goes through this location becomes a problem every monsoon and the leaders do not take corrective actions.

V
Vijaya Fultankar Verified
1 month ago

Dangerous

S
Shirish Dadke Verified
1 month ago

To prevent the loss of public life & Security

P
Pankaj Dixit Verified
1 month ago

Every change starts from self action. To save our city We must ACT.

Help this petition grow

Share it with friends to help reach 50 signatures.

Your share link

Share directly