Skip to main content
We Support Vijayrao Auti

We Support Vijayrao Auti

194 signatures 56 to reach 250
K
Kishor S. signed
R
Ravi g. signed
G
Ganesh D. signed
A
Akshay signed
S
Shivaji g. signed
S
Shivaji s. signed
S
Someone signed
K
kundlik s. signed
S
Subhash k. signed
Y
Yogesh s. signed
शप
Started by शिवसैनिक पारनेर 6 years ago

माननीय शिवसेना पक्षप्रमुख!!

मागील काही दिवसापासून पारनेरच्या नगरसेवकांचे जे प्रकरण चालु आहे त्याविषयी थोडक्यात काही गोष्टी आपणास सांगु इच्छितो.

शिवसेनेचे पाच नगरसेवक राष्ट्रवादी पक्षात ४ जुलै ला गेले आणि ९ जुलै ला परत शिवबंधनात आले हे सर्व महाराष्ट्रातील जनतेने पाहिले.

खरं पाहिले तर चारच नगरसेवक हे शिवसेना पक्षाचे होते त्यापैकी एक हा अपक्ष नगरसेवक आहे.

२०१५ साली पारनेर नगरपंचायतीची निवडणूक झाली त्यात १७ पैकी ९ नगरसेवक निवडून आलेले आहेत.

त्यामुळे शिवसेना स्वबळावर सत्ता स्थापन करू शकत असताना सुद्धा अपक्ष निवडून आलेले ५ नगरसेवक शिवसेनेच्या बाजूने आले आणि पारनेर नगरपंचायतीवर भगवा फडकला.

अडीच वर्षाचा कालावधी संपत आला आणि शिवसेना पक्षातील काही नगरसेवक नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक होऊ लागले.

परंतु आमदार विजयराव औटी यांनी सारासार विचार करून आताच राष्ट्रवादी मध्ये चाललेल्या एका महिला सदस्याचे नाव अंतिम करत असतानाच फक्त सत्तेच्या लालसे पोटी काही नगरसेवकांनी बंड केले व एका अपक्ष नगरसेवकानी नगराध्यक्षा पदासाठी अर्ज केलेला होता त्याला आपला पाठिंबा दिला.

सदर अपक्ष उमेदवार नगराध्यक्ष झाल्यावर परत शिवसेनेकडे आला परंतु बंडखोर नगरसेवकांची मात्र गोची झाली आणि त्यातूनच आमदार विजयराव औटी यांना त्रास देणें सुरु झाले.

याच सत्तेची हाव म्हणून पुढील भाग की परत एकदा सत्तेच्या वळचणीला गेले आणि त्यांचा डाव माननीय अजितदादा आणि खुद्द मुख्यमंत्री यांनी हाणून पाडल्यावर आता परत औटी साहेबांना शिवसेना पक्षातून काढा असा बालिश पणा चालु केला आहे.

वास्तविक आम्ही पारनेर तालुक्यातील सर्व शिवसैनिक विजयराव औटी साहेबांच्या बरोबर खंबीरपणे उभे आहोत.

आमची आपणास विनंती आहे आपण सदर प्रकरणात लक्ष घालून सदर संबंधित लोकांना समज द्यावे जेणेकरून शिवसेना पक्षाचे पारनेर तालुक्यातील नुकसान होणार नाही.

आता सध्या जी काही टीका विजयराव औटी साहेबांवर होते आहे ती खरंच असती तर पारनेर नगर तालुक्यातील जनतेने त्यांना आमदार पदी सलग तीन वेळा निवड कशी केली असती हाही एक प्रश्न आहेच.

चाललेल्या घडामोडींवरून लक्ष विचलित करण्यासाठी हा सर्व प्रकार चाललेला आहे असे एकंदरीत दिसत आहे.

आमची आपणास विनंती आहे आपण माननीय विजयराव औटी यांना आपण विधानपरिषद सदस्य पदी निवड करावी अशी आमच्या पारनेर नगर तालुक्यातील शिवसैनिकांची इच्छा आहे.

औटी साहेब यांचा स्वभाव नक्कीच कडक असल्यामुळे त्यांच्या बाबतीत कायमच चुकीचा अर्थ काढला जातो आणि राजकारणात ते ओघाने येतेच.

आपण आमच्या विनंतीचा नक्कीच विचार कराल अशी आम्ही सर्व शिवसैनिक आशा बाळगतो.


आपले विश्वासू,

शिवसैनिक पारनेर-नगर तालुका..

Updates

July 11, 2020

The situation surrounding Vijayrao Auti continues to weigh heavily on those of us who believe in loyalty to the party. I have been listening to the frustration of local supporters who feel this internal drama is nothing but a distraction from our true goals. We will not let these baseless demands for his removal go unchallenged.

July 11, 2020

Seeing the overwhelming response from those who recognize Vijayrao Auti's true dedication to our party brings me immense relief. It is clear now that people see through the selfish games being played against him.

Reached 100 supporters

July 11, 2020

151 Comments

S
Shekhar Kashid
6 years ago Featured

जय महाराष्ट्र साहेब ....आपणांस विंनती आहे की मा.आ.विजय औटी साहेब यांनी तालुक्यात शिवसेना युवासेनेची बांधनी खुप चांगली केली आहे जर आपण पारनेरच्या लोकप्रतिनिधीचे ऐकुन कोणता निर्णय घेणार असेल तर ते पक्षासाठी घातक ठरेल २०१९ च्या निवडणुकीत औटी साहेबांचे मताधिक्य मागच्या निवडणुकी पेक्षा वाढलेच आहे त्यामुळे कोणताही निण्रय घेताना औटी साहेबांना विश्वासात घ्यावे ही विंनती

A
Amol shinde
6 years ago Featured

कार्यासाम्राट नामदार विजयरावजी औटी साहेबांना राजीनामा मागणारे शिवसैनिक आहेत का,त्यांनी आधी आपण पक्षनिष्ठ आहोत का हे तपासून घ्यावे,विरोधकांनी नामदार साहेबानवर टीका करण्या पेक्षा विकासाच्या मुद्यावर बोलावे,विकास बघावा,पारनेर मधील शिवसैनिक औटी साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे,कडवट शिवसैनिक शिवसेना सोडत नसतो.

A
Abhijeet Auti
6 years ago Featured

औटी साहेबांचे काम खरच कौतुकास्पद आहे। एक सामान्य शिवसैनिक त्यांचया सोबत खंबिर उभा आहे। साहेबांनि १५ वर्ष तालुक़ा खुप शिस्तित वगवलाआणि वाढ़वलाय अम्हाला ती शिश्त पारनेर मधे परत हावी आहे CM साहेब अमच्या साहेबांना ताक़त द्या। हिच एक प्रामाणिक शिवसैनिकचि तुमच्या कड़े माघनी

A
Akshay Sunil Dushman
6 years ago Featured

होय, मी श्री विजयराव औटी साहेब यांच्या बरोबर आहे.., काही लोक नाहक स्वतः च्या फायद्यासाठी इकडून तिकडे गेले आहेत, त्यांची भूक मोठी असेल कदाचित., पण असो... आम्हाला त्याचे देणं घेणं नाही, पण यातून जर कोणी तालुका शिवसेने ला बदनाम आणि औटी साहेब यांचा अनादर करत असेल तर तो सहन केला जाणार नाही, हे विरोधकांनी ध्यानी ठेवावे..

M
Mahesh Korde
6 years ago Featured

Auti saheb is Sincere worker and rare politician currently who having desire to implement the work properly which he had taken in hand. I am agree he is strict & disciplined which is their good quality. Some people don’t like this because of they just want their benefits not the social benefits. He is truly doing social projects not the any ones individual interest.

S
shivam badhe
6 years ago Featured

नामदार विजयराव औटी साहेबांनी पंधरा वर्षे संघर्ष करून पारनेरमधे शिवसेनेला मुर्त स्वरूप प्राप्त करून दिले त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी त्यांच्या कामाच्या माध्यमातून पारनेर मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलला

R
Ravi gaikwad
6 years ago

I am with auti saheb

A
Akshay
6 years ago

Saheb

Help this petition grow

Share it with friends to help reach 250 signatures.

Sign Petition

We never post to your account. Social sign-in is used only to verify your signature.

or sign with Email

Add a comment?

Your signature will be added via . Tell others why you're signing — it's optional.

By signing, you accept iPetitions Terms of Service and Privacy Policy.

Share Petition

Don't stop at signing, share the petition link with friends to multiply our impact

Copy link or share directly

Instagram
QR Code