Rajani Deodhar 0

कमोडचा अट्टाहास कशासाठी?

8 people have signed this petition. Add your name now!
Rajani Deodhar 0 Comments
8 people have signed. Add your voice!
8%
Maxine K. signed just now
Adam B. signed just now

कमोडचा अट्टाहास कशासाठी? गेल्या काही वर्षात निवासी जागा व सार्वजनिक ठिकाणी इंडिअन ऐवजी कमोड पद्धतीची प्रसाधनगृहे बांधली जात आहेत. वास्तविक नैसर्गिक पद्धतीने बसता येईल,अंगावरचे कपडे जमिनीवर लोळणार नाहीत,कपडे सावरायला एकही हात गुंतणार नाही, तळपाय सोडून अन्य शरीराला संडासाचा स्पर्श होणार नाही,शारीरिक स्वच्छता पाण्याने नीट करता येईल पॉटमधील घाणेरडे पाणी अंगावर उडणार नाही व नजरेस दिसणार नाही,अशा पद्धतीचे इंडिअन प्रसाधनगृह सोयीचे. परंतू बिल्डर्स नि झटपट बांधकाम उरकून टाकण्यासाठी हि घाणेरडी पद्धत लोकांचा माथी मारली आहे .काही जणांनी अंधानुकरणातून ती स्वीकारली आहे.तर शारीरिक व्याधींमुळे इंडिअन प्रसाधनगृह वापरू न शकणाऱ्या काही लोकांची सोय झाली आहे.त्यांच्यासाठी जरूर कमोड बांधावेत . पण उर्वरीत मोठ्या वर्गाचे काय? दोन व त्याहून अधिक प्रसाधनगृहे असलेल्या निवासी जागेमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी एकही इंडिअन प्रसाधनगृह न ठेवण्याचे हे बिल्डर्स ने आणलेले घातक धोरण रोग राईला आमंत्रण देणारेच आहे. त्याला प्रतिबंध करणे गरजेचे असल्याने मी लोकसत्ता वास्तुरंग, चतुरंग मध्ये अनेकदा लिहिले आहे. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला आहे.महिला वर्गाला तर सार्वजनिक ठिकाणी असलेले कमोड अतिशय त्रासदायक वाटत असल्याचे विविध ठिकाणी घेतलेल्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे. मुंबई महापौर यांनी देखील ह्या बाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.सार्वजनिक ठिकाणी एखादा कमोड व सर्व इंडिअन प्रसाधनगृहे तसेच निवासी जागेमध्ये निदान एक तरी इंडिअन प्रसाधनगृह बांधणे अनिवार्य करण्यात यावे. तुंबड्या भरू, बिनडोक बिल्डर्स नि आणलेली हि पद्धत वेळीच उखडली नाही तर पुढच्या पिढीत नाहक रुजेल. व सार्वजनिक स्वच्छता नसलेल्या आपल्या देशात संसर्ग जन्य रोगांना आमंत्रण देणारी ठरेल ह्यात शंकाच नाही. रजनी अशोक देवधर.

Share for Success

Comment

8

Signatures